आजकाल अनेक लोक शेअर बाजाराकडे एक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. जसे कि झटपट पैसे कमवण्याचे साधन वाटते, तर काहीजण त्याकडे दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून पाहतात. त्यामुळेच, शेअर बाजार हा सट्टा आहे का तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणूक, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जर ह्या क्षेत्रात शिक्षण घेऊन काम केले तर नक्कीच तंत्रज्ञान म्हणु शकतो नाही तर सट्टाच!
शेअर बाजार म्हणजे जिथे आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री करू शकतो. सध्याच्या काळात शेअर्सची खरेदी-विक्री हि पूर्ण पणे डिजिटली चालते. आपणास कुठे जाण्याची गरज पडत नाही.
कंपनीचे शेअर्स म्हणजे मालकी हक्काचा तुकडा. जेव्हा कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी स्वतःला शेअर मार्केट मध्ये आणते. इन्व्हेस्टर कंपनीचा अभ्यास करुन त्यामध्ये गुंतवणुक करतात म्हणजे शेअर्स खरेदी करतात आणि शेअर्सच्या किंमती प्रमाणे कंपनीला पैसे देतात. शॉर्टटर्म मध्ये शेअर्सची किंमत बातमी आणि चार्ट बेसिसवर हलतात, तसेच लॉंगटर्म मध्ये कंपनीच्या बिसनेस ग्रोथवर अवलंबुन असते.
बऱ्याच लोकांच्या मते, शेअर बाजार हा एकप्रकारचा सट्टा आहे, कारण इथे पैशांची गुंतवणूक केल्यानंतर नफा किंवा तोटा यावर कोणताही ठाम अंदाज बांधता येत नाही. पण माझ्या मते असा कुठलाच बिसिनेस नाही जिकडे रिस्क नाही. कोणत्याही बिसिनेसमध्ये अभ्यास न करता, रिस्क मॅनेज न करता जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला सट्टाच म्हणु. सट्टेबाजारामध्ये नशिबावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. काही लोक अल्पावधीत जास्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने कोणतेही संशोधन न करता गुंतवणूक करतात आणि त्यातून त्यांना तोटा होतो. त्यामुळे शेअर बाजार सट्टा असल्याचा गैरसमज पसरतो.
शेअर बाजार केवळ नशिबाचा खेळ नाही, तर तो विश्लेषण, माहिती आणि योग्य निर्णयक्षमतेवर आधारित आहे. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेअर बाजाराचे बारकावे समजून घेणे शक्य झाले आहे. शेअर बाजारात अभ्यास करण्याच्या दोन पद्धती आहेत, १. फंडामेंटल २. टेक्निकल (चार्ट स्टडी). यासारख्या अभ्यासाचा उपयोग करून गुंतवणूकदार आणि ट्रेडर सुयोग्य निर्णय घेतात. तांत्रिक व मूलभूत विश्लेषणाच्या मदतीने शेअर्सची किंमत कशी बदलते हे समजणे सोपे होते.
क्षेत्र कोणतेही असो तिथे यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेणे हा मूलभूत पाया आहे. तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि योग्य माहिती आवश्यक आहे. योग्य अभ्यास, ट्रेंडचे निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण आणि धैर्य यामुळे गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीर ठरू शकते.
निष्कर्ष
शेअर बाजार हा सट्टा नसून पैस्याचे योग्य नियोजन, अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास चांगल्या संधी उपलब्ध करून देणारा गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट पर्याय आहे. त्यामुळे, सट्टा आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेऊन शहाणपणाने शेअर बाजारात पाऊल टाकावे.
Stay Connect With Us! 📈
Follow us for daily market insights, experts, & exclusive updates.
📹 YouTube: Click Here 🔗 LinkedIn: Click Here
🐦 Twitter (X): Click Here 🌟 Instagram: Click Here
📘 Facebook: Click Here 💬 Join Our Community: Click Here
🌐 Website: Click Here / Blogs: Click Here
📚 🎓 Our Courses: Level-1 | Level-2 | Level-3
Disclaimer: The contents produced here are purely for educational purposes. They should not be construed as buy/sell recommendations. Readers are advised to consult their Investment advisor before making any decisions based on the above write-up.
कोणत्याही बिसिनेसमध्ये अभ्यास न करता, रिस्क मॅनेज न करता जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला सट्टाच म्हणु. सट्टेबाजारामध्ये नशिबावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. काही लोक अल्पावधीत जास्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने कोणतेही संशोधन न करता गुंतवणूक करतात आणि त्यातून त्यांना तोटा होतो. त्यामुळे शेअर बाजार सट्टा असल्याचा गैरसमज पसरतो.
ReadIn this write-up, we are trying to compare the similarities and differences between cricket and share trading. We will discuss and understand everything step by step. Then you will have to have to decide after reading this.
ReadIn our last write-up, we discussed the fundamentals and technical of SULA Vineyards Ltd & share price worked well as expected. Recently, we found one more company that has given a breakout on the weekly chart, and currently share price is at attractive levels i.e. Bajaj Consumer Ltd. If we look at the company fundamentals are strong and products are demanding.
ReadSula Vineyards has given a breakout on the weekly chart after making a Double Bottom. If we look at the Sula Wines product those are very demanding in India and out of as well.
ReadFor freshers who are interested to start a stock market investment or trading.
Get StartedFor those who want to levels up their Trading & Investing by making great predictions.
Get StartedFor those who wants to start their career in Forex & Crypto Market and want to become full time trader.
Get Started